जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
येवला तालुक्यातील महालखेडा येथे एक्सप्रेस कॅनोलमध्ये एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेल्याची घटना घडलीय. यात वडील व दोन मुलांचा समावेश आहे. कॅनोलमध्ये पाणी आणण्यासाठी मुलगा गेला असता तोल जाऊन तो कॅनोलमध्ये पडला असता वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली हे बघून दुसऱ्या मुलाने पण त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.
वडील सोमनाथ गीते, कार्तिक गीते व सत्यम गीते अशी मुलांची नावे आहेत. यांपैकी वडील आणि एका मुलाचा मृतदेह सापडलाय. तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह शोधण्यात मात्र पोलिसांचा यश आलेले नाही.