जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
उल्हासनगर मध्ये केमिकल टॅंकरचा भिषण स्फोट झाला आहे. घटनास्थळाजवळच लहान मुले नेहमीप्रमाणे खेळत होते. स्फोटाच्या संपर्कात येऊन ही मुले आगीत हेरपळून गंभीर जखमी झाली आहेत.
हरिअंत सिंग (09), प्रविण सोनी (13 ), हर्ष सोनी (15 ) ही तीन मुलं स्फोटात गंभीर जखमी झाली आहेत. नागरिकांच्या साहाय्याने तातडीने त्यांना ममता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फवारणीसाठी केमिकलचा वापर करण्यासाठी सफाई कामगारांनी केमिकलचं टॅंक उघड्यावर ठेवले होते. सफाइकामगारांच्या बेजबाबदारपणामुळे हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे.