जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील मेट्रो-3च्या भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेनं पुन्हा सुरुंग लावला. गोरेगावच्या आरे कॉलनीत कारशेडसाठी जागा देण्याच्या प्रस्तावानंतर अंधेरीतील आरक्षित भूखंड देण्याचा प्रस्तावही शिवसेनेनं फेटाळला.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा 18 किलोमीटरच्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या मार्गासाठी इलेक्ट्रिक सब स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंधेरीतील मलनिस्सारण प्रकिया केंद्राकरिता राखीव असलेला 4 हजार चौरस मीटरची जागा द्यावी, अशी मागणी एमएमआरडीएनं पालिका प्रशासनाकडे केली.
मात्र, मुंबईकरांच्या सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड कुठल्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पाला देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून हा दुसरा धक्का आहे.