जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत राणेंनी काँग्रेसवर हल्ला बोल केला.
राणेंनी काँग्रेस आमदारकीचा तसेच सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राणेंसोबत निलेश राणे यांनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आमदार नितेश राणे यांचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं राणेंनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं नाही. वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला असे गंभीर आरोपही त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर केले आहेत.
राज्यातून काँग्रेस आणि शिवसेना रिकामी करणार अशी प्रतिज्ञाच नारायण राणेंनी केली. शिवसेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असा गौप्यस्टफोही राणेंनी केला.