भारतीय हॉकी संघाचा हाँगकाँगवर 26-0 ने दणदणीत विजय!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता   खेळाच्या बाबतीत आजचा दिवस भारतासाठी विजयाचा दिवस ठरला आहे. क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून लगान वसूल केल्यावर आता अशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुषांच्या हॉकी संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या संघाने हाँगकाँगवर 26-0 असा दणदणीत विजय मिळवला आहे.   याआधीही इंडोनेशियावर भारतीय संघाने 17-0 ने विजय मिळवला होता. हाँगकाँगविरोधातील सामनाही असाच एकतर्फी ठरला. सुरुवातीपासूनच […]

भारतीय हॉकी संघाचा हाँगकाँगवर 26-0 ने दणदणीत विजय!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता

 

खेळाच्या बाबतीत आजचा दिवस भारतासाठी विजयाचा दिवस ठरला आहे. क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून लगान वसूल केल्यावर आता अशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुषांच्या हॉकी संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या संघाने हाँगकाँगवर 26-0 असा दणदणीत विजय मिळवला आहे.

 

याआधीही इंडोनेशियावर भारतीय संघाने 17-0 ने विजय मिळवला होता. हाँगकाँगविरोधातील सामनाही असाच एकतर्फी ठरला. सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत पहिल्या दोन मिनिटांतच पहिला गोल केला. तर पुढच्या मिनिटाला दुसरा गोलही करून झाला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 4, दुस-या क्वार्टरमध्ये 8 गोल केले तर, दुस-या सत्रात भारताने तब्बल 12 गोल केले.

 

या विजयानंतर भारत सहा गुण मिळवत अ गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number