वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता विवेक ओबेरॉयही जवानांच्या मदतीसाठी पुढे आला.
सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांच्या कुटुंबियांना विवेक ओबेरॉय घर देणार आहे.
छत्तीसगडमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवानांना वीरमरण आलं होते.
शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. शहीदांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्यावर केलेले उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही, पण त्यांच्या
कुटुंबियांच्या डोक्यावर हक्कांचं छप्पर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विवेक ओबेरॉयनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.