राज्यात आचारसंहिता भंगच्या २४६९ तक्रारी

विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या राज्यभरात २४६९ तक्रारी प्राप्त झाल्या.

राज्यात आचारसंहिता भंगच्या २४६९ तक्रारी

 
मुंबई : विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या राज्यभरात २४६९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २४५२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत २५३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान वस्तू इत्यादी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्यात ठिकठिकाणी भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number