जय महाराष्ट्र हेडलाईन्स 10.00 am
1.#Headline – काँग्रेसची लोकसभेसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, सोनिया गांधींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम, रायबरेलीतून लढणार, तर राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे अमेठीमधून रिंगणात उतरणार
2.#Headline –देशात काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांविरोधात तिटकारा,अरूण जेटलींचा राहुल गांधींवर हल्लाबोल,राफेल प्रकरणी काँग्रेस खोट्याचा आधार घेत असल्याची टीका..
3.#Headline –राहुल गांधींनी घेतली जी-20 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट,महत्त्वाच्या विषयांवर केली चर्चा,काही शेजारी देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही भेटीसाठी आमंत्रण
4.#Headline – पाकिस्तानची 182 मदरशांवर कारवाई,पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव…
5.#Headline – दहशतवादाच्या मुद्द्यावरून बिलावल भुत्तोंचा इम्रान खान सरकारवर जोरदार हल्लाबोल,पंतप्रधानांना फाशी दिली जाऊ शकते तर दहशतवाद्यांवर कारवाई का नाही, केला सवाल…
6.#Headline – राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा…
7.#Headline – लोकसभा निवडणुकीआधी मुंबईकरांना खूश करण्यासाठी सरकारचं गिफ्ट,रेल्वे प्रवासासाठी MUTP ३ अ प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी..
8.#Headline – समुद्राच्या उधाणामुळं होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी मिळणार मदत,राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत…
9.#Headline – केईएम रूग्णालयाच्या शवागर आणि शवविच्छेदनगृहाची दुरावस्था,महापालिका अधिकारी आज करणार पाहणी,जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट…
10.#Headline – मुंबईतील श्रृतिका घाग या कलाकाराची अनोखी कलाकृती, जागतिक महिला दिनानिमित्त 125 फूट लांब साडीवर साकारलं जिजाऊंचं चरित्र, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद