जय महाराष्ट्र हेडलाईन्स 8.00 AM
1.#Headline काँग्रेसची लोकसभेसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार तर राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे अमेठीमधून रिंगणात उतरणार
2.#Headline राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा
3.#Headline खोतकर -दानवे वाद बरा करणारे डॉक्टर मुंबईत नसल्यानं तोडगा निघाला नाही, उद्धव ठाकरेंचा अर्जुन खोतकरांना टोला
4.#Headline मनसेला महाआघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट,संजय निरूपमांचा राज ठाकरेंना विरोध असल्याचा नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
5.#Headline अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठीच्या मोबाईल खरेदीत,65 कोटींचा घोटाळा धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर आरोप पण पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळले…
6.#Headline अकरावीच्या प्रवेशामध्ये खुल्या प्रवर्गाला जागाच नसल्याच्या टीकेवर शिक्षण मंत्र्यांचा खुलासा,10 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याची शिक्षण
मंत्र्यांची माहिती…
7.#Headline केईएम रूग्णालयाच्या शवागर आणि शवविच्छेदनगृहाची महापालिका अधिकारी आज करणार पाहणी,जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट…
8.#Headline जम्मूमध्ये बस स्थानकावरील ग्रेनेड हल्ल्यात 30 जण जखमी तर एकाचा मृत्यू,मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ,हल्ल्यामागे ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा हात असल्याचा पोलिसांना संशय, एका संशयिताला अटक…
9. #Headline काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन, कर्करोगाच्या आजाराने वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10.#Headline मुंबईतील श्रृतिका घाग या कलाकाराची अनोखी कलाकृती, जागतिक महिला दिनानिमित्त 125 फूट लांब साडीवर साकारलं जिजाऊंचं चरित्र, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद