जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट स्थापन केल्याबाबत माहितीच नसल्याची कबुली दिवाकर रावतेंनी जय महाराष्ट्रला दिली. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन भूमिका ठरवू असंही रावते म्हणाले. दरम्यान शिवसेनेची भूमिका सातबारा कोरा कऱण्याचीच असेल या भूमिकेचा पुनरुच्चारही रावतेंनी केला.
राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेनेला सामील करुन घेण्यात येत नाही असा आरोप वारंवार शिवसेनेकडून होतो. त्याच पार्श्वभूमीवर रावतेंच्या नावाचा समावेश करुन शिवसेनेच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र सरकारकडून होताना दिसला. मात्र, मंत्रिगटाबाबत काहीच माहिती नसल्याचा खुलासा करत रावतेंनी एकप्रकारे भाजपवर विश्वासात घेतलं नसल्याचाच आरोप केला.