टॉलिवूडचा सुपरस्टार महेश बाबू कलाकार म्हणून लोकप्रिय आहेच, पण तो तेवढाच हळवा पितादेखील आहे. आपल्या मुलाच्या 12व्या वाढदिवसानिमित्त महेशने त्याच्यासाठी एक प्रेमळ पोस्ट लिहिली आहे.
“बघता बघता वेळ निसटून गेला हे समजलंच नाही आणि माझ्या मुलाने आज 12व्या वर्षात पदार्पण देखील केलं. माझ्या सगळ्यात आवडत्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा… त्याला तारूण्यात प्रवेश करताना पाहणं हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.” असं महेश बाबूने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. महेशने आपल्या मुलासोबतचा एक खास फोटोही पोस्ट केला आहे.
महेश बाबू हा तेलुगू फिल्म्समध्ये काम करत असला, तरी त्याचे फॅन्स जगभरात आहे. मात्र महेश बाबू कामाव्यतिरिक्त आपला वेळ आपल्या कुटुंबासोबतच व्यतित करणं पसंत करतो. त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर मराठी आहे.

काही महिन्यांपूर्वीच रिलिज झालेल्या त्याच्या ‘भारत अने नेनू’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कमाई केली आहे. सध्या महेश बाबू आगामी ‘महर्षी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत पूजा हेगडे ही नायिका आहे.