सेंसॉरशिप नसल्यामुळे वेब सीरीज करायला आवडते – स्वरा भास्कर

आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे स्वरा भास्कर चांगलीच चर्चेत आहे. ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ या वेब सीरिजमधील तिची भूमिका लोकांना खूप आवडली. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकच नव्हे, तर खुद्द स्वराही खूप उत्सुक आहे. स्वराच्या मते, वेब सिरीज ही तिच्या सारख्या वेगळं काही करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी उत्तम संधी आहे.    वेब सिरीजमध्ये सेंसॉरशिप नसते ‘वीरे दी वेडिंग’ […]

सेंसॉरशिप नसल्यामुळे वेब सीरीज करायला आवडते – स्वरा भास्कर

आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे स्वरा भास्कर चांगलीच चर्चेत आहे. इट्स नॉट दॅट सिंपल या वेब सीरिजमधील तिची भूमिका लोकांना खूप आवडली. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकच नव्हे, तर खुद्द स्वराही खूप उत्सुक आहे. स्वराच्या मते, वेब सिरीज ही तिच्या सारख्या वेगळं काही करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी उत्तम संधी आहे.

  

वेब सिरीजमध्ये सेंसॉरशिप नसते

वीरे दी वेडिंग या चित्रपटात स्वरा तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली होती. यानंतर खूप लोकांनी स्वराला ट्वीटरवर ट्रोल करण्यात आलं. मात्र स्वराचा या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही. मात्र सिनेमात काम करताना काही गोष्टींच्या मार्यादा पाळाव्या लागतात. वेब सिरीजसाठी मात्र सेंसॉर बोर्ड नसल्यामुळे कलाकारांना सेंसॉरशिपची भीती नसते. त्यामुळे भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकतो, असं स्वराला वाटतं.

  

याआधीही स्वरा भास्करने महिलांचे प्रश्न मांडणारे अनेक चित्रपट केले आहेत. तिच्या चित्रपटांना आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही दाद दिली आहे. इट्स नॉट दॅट सिंपल या वेबसिरीज दुसऱ्या सीजनमध्ये ती लवकरच दिसणार आहे. यामध्ये पती-पत्नीचे संबंध, प्रेम प्रकरण, विवाहबाह्य संबंध अशा विषयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number