मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सात दरोडेखोऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 22 मोबार्इल फोन, 3 लॅपटॉप, टीव्ही, एक महिंद्रा पिकअप गाडी, दोन संगणक असा एकूण 6 लाख 84 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहेत. या सात सराईत दरोडेखोऱ्यांची नावं खालीलप्रमाणे-
सोनू गौतम, वय वर्षे 19
संदीप साहू, वय वर्षे 22
राकेश राजभर, वय वर्षे 32
जितेश उर्फ जितू दुसगे, वय वर्षे 39
राजेश राजभर, वय वर्षे 28
छोटेलाल शर्मा, वय वर्षे 42
रामकिशन यादव, वय वर्षे 40
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात 20 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला. मात्र प्राथमिक तपासात काही सुगावा लागत असल्याने पोलीस यंत्रणेने आणखी सखोल तपास सुरु केली. पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलचा सीडीआर प्राप्त करत या गुन्हेगारांचा शोध सुरु केला. सीडीआरच्या सहाय्याने तपास करत संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु करण्यात आली. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या साथीदारांची नावे आणि ठावठिकाणा सांगत गुन्ह्यांची कबुली दिली. या 7 ही आरोपींना पोलीस उपायुक्त संजय शिंदे, सह-पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डांबरे, वाघ, हवलदार काटकर, पोलीस नाईक भोईर, माने, सानप या पथकाने या ठाव ठिकाण्यांवर छापा टाकताच हा सगळा प्रकार समोर आला.