जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
शिवसेना आमदाराच्या दादागिरीची घटना साताऱ्यात समोर आली आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णा लेक येथील चौकात अडवली. ते आमदार आहेत हे वनसमितीच्या कार्यकर्तांना महिती नव्हते. त्यामुळे वनसमितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडेही पर्यटन कर मागितला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार कातेंनी गाडीतून उतरुन तरुणाला चोप देण्यास सुरुवात केली.
यावेळी मोठी बाचाबाची सुद्धा झाली. धक्कादायक बाब म्हणजे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात मारकुट्या सेना आमदाराविरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. त्याउलट, वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.