जय महाराष्ट्र वेब न्यूज, विरार
मित्रांनी आवाज न दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने मित्रावरच धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे.
सुजीत गोपीनाथ नायर असं जखमी युवकाचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
19 ऑगस्ट रोजी रविवारी दुपारी विरार पूर्व परिसरात राहणारा मित्रांचा गट नेहमीच्या जागी जमला होता.
या गटातील अझीम हा नशेमध्ये असल्याने त्याला कोणी आवाज दिला नाही.
हा राग मनात धरून त्याने जमलेल्या मित्रांसोबत वाद सुरु केला.
काही वेळाने हा वाद मिटला.
मात्र अझीमच्या मनात या टोळक्यातील सुजीत नायरवर राग होता.
सुजीत ज्या कपड्याच्या दुकानात काम करतो, त्या ठिकाणी अझीमने आपल्या तीन साथीदारांसह पाळत ठेवली.
रात्री 8.30 च्या सुमारास सुजीत कपडे अल्टरेशनसाठी बाहेर आला असता त्यावर अझीमने धारदार शास्त्राने हल्ला चढवला.
फुलपाडा रिक्षा स्टँडवर प्रकार घडला. सुजीतच्या पाठीवर, हातावर सपासप वार सुरू झाले तेव्हा तो पोलीस ठाण्याच्या दिशेने पळू लागला.
इतक्यात स्टँडवर असलेल्या नागरिकांनी त्यातील एका हल्लेखोरला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
रात्री स्टेशन परिसरात असलेल्या फुलपाडा रिक्षा स्टँड हा रहदारीचा परिसर असून या ठिकाणी लहान मुले, महिलांचा वावर जास्त असतो. त्यामुळे भरचौकात असा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.