अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गणेश मंडळांच्या मंडपांना महापालिकेकडून परवानग्या मिळत नाहीत. त्यामुळे या परवानग्यांबाबत या बैठकीत मुखमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, यश सरदेसाई हे देखील […]

अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गणेश मंडळांना होणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

गणेश मंडळांच्या मंडपांना महापालिकेकडून परवानग्या मिळत नाहीत. त्यामुळे या परवानग्यांबाबत या बैठकीत मुखमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, यश सरदेसाई हे देखील उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

गणेशोत्सव मंडळांना हात लावाल तर हात छाटू असा धमकीवजा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टंमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट महत्त्वाची आहे.

 

 

संबंधित बातम्या

शिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number