“मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर…?” वारीस पठाण यांचा सवाल

सीमा दाते,जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   वैभव राऊतला अटक केल्या नंतर सनातन संस्थेसंदर्भात अनेक धागेदोरे मिळत आहेत. त्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी एमआयएम पक्षाचे आमदार वारीस पठाण केली आहे. “जर असा शास्त्रसाठा एखाद्या मुसलमानाकडे सापडला असता, तर त्याला आतंकवादी घोषित केलं असतं. त्यांना पाकिस्तानात हाकलण्याची भाषा करण्यात आली असती. मग अशीच घटना सनातनसंदर्भात घडली […]

“मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर…?” वारीस पठाण यांचा सवाल

सीमा दाते,जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वैभव राऊतला अटक केल्या नंतर सनातन संस्थेसंदर्भात अनेक धागेदोरे मिळत आहेत. त्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी एमआयएम पक्षाचे आमदार वारीस पठाण केली आहे.

“जर असा शास्त्रसाठा एखाद्या मुसलमानाकडे सापडला असता, तर त्याला आतंकवादी घोषित केलं असतं. त्यांना पाकिस्तानात हाकलण्याची भाषा करण्यात आली असती. मग अशीच घटना सनातनसंदर्भात घडली असता ‘सनातन’ संस्थेवर बंदी का नाही? असा सवाल पठाण यांनी केला आहे. वैभव राऊत विरोधात कारवाई करण्यामध्ये सरकार का दिरंगाई करत आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे सनातन संस्थेकडून आणखी काही अनुचित प्रकार घडण्याआधी सरकारने या संस्थेला आतंकवादी संघटना घोषित करून या संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

 Vaibhav-Raut-b_d.jpg

 

एटीएसने अटक केलेला हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घर तसंच दुकानातून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब आणि शस्त्रे हस्तगत करण्यात आली होती.

20 गावठी बॉम्ब
5 गावठी पिस्तुले
3 अर्धवट तयार पिस्तुले
41 जिवंत काडतुसे
तसंच शस्त्रांसाठी लागणारं अन्य साहित्य यांचाही त्यात समावेश होता.

 

18 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या समर्थनार्थ ‘जन आक्रोश रॅली’ही काढण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number