जय महाराष्ट्र वेब टीम, कोल्हापूर
कर्नाटक एसआयटीच्या तपासात मोठी माहिती उघड झाली आहे.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असणा-या गणेश मिसकीन याचा पुरोगामी विचारवंत कालबुर्गी यांच्या हत्येमध्येही सहभाग होता.
खुद्द गणेश मिसकीननेच याची धक्कादायक कबुली दिली आहे.
कलबुर्गी यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या घराचे दार ठोठावण्यात गणेशचा पुढाकार होता.
गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी गणेश मिसकीन हाच दुचाकीवरून परशुराम वाघामारेला घेऊन आल्याचंही चौकशीमध्ये स्पष्ट झालं आहे.