स्वातंत्र्यदिनी इंग्लंडकडून भारताला बुद्धमूर्ती परत!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. 72 वर्षांनी पुन्हा एकदा भारतीयांना ब्रिटिशांकडून अनोखी भेट मिळाली आहे. हे भेट म्हणजे 57 वर्षांपूर्वी भारतातूनच चोरीला गेलेली दुर्मिळ बुद्धमूर्ती… ही बुद्धमूर्ती बाराव्या शतकातील आहे. 1961 साली बिहारच्या नालंदा येथील पुराण वस्तूसंग्रहालयातून ही बुद्धमूर्ती चोरीला गेली होती. चांदीचा कशिदा असणारी ब्राँझची ही […]

स्वातंत्र्यदिनी इंग्लंडकडून भारताला बुद्धमूर्ती परत!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. 72 वर्षांनी पुन्हा एकदा भारतीयांना ब्रिटिशांकडून अनोखी भेट मिळाली आहे. हे भेट म्हणजे 57 वर्षांपूर्वी भारतातूनच चोरीला गेलेली दुर्मिळ बुद्धमूर्ती…

ही बुद्धमूर्ती बाराव्या शतकातील आहे. 1961 साली बिहारच्या नालंदा येथील पुराण वस्तूसंग्रहालयातून ही बुद्धमूर्ती चोरीला गेली होती.

चांदीचा कशिदा असणारी ब्राँझची ही मूर्ती लंडनमध्ये लिलावासाठी आली होती.

यावेळी स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या कला आणि पुराणवस्तू शोध विभागाने ही मूर्ती ताब्यात घेतली.

15 ऑगस्ट 2018 ला भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी ही मूर्ती इंग्लंडमधील भारतीय राजदूत वाय. के. सिन्हा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

ही मूर्ती लवकरच पुन्हा आपल्या मूळस्थानी नालंदा येथे विराजमान होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number