जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने गुगलने जगातील कामगारांसाठी एक खास डुडल तयार केलं आहे. अवजारांचा आधार घेत गुगलने आपल्या होमपेजवर ‘Google’ हे अक्षर तयार केलं आहे. यामध्ये पक्कड, हातमोजे, टेप रोल्स, पाना आणि मोजपट्टी यांचा वापर करण्यात आला आहे.
या खास डुडलच्या माध्यमातून जगातील कामगारांनी दिलेल्या योगदानाचा गुगलने सन्मान केला आहे. 1886 सालापासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. 1889 साली कामगारांच्या आंतरराष्ट्रीय परिषेदेनंतर भारतासह 80 देशांमध्ये 1 मे रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.