शिडीतील साईंच्या दरबारात आलेल्या दोघा भाविकांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   सलग तीन दिवस सुट्या असल्यानं शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केलीय. साई दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झालाय. साई मंदिरांच्या 3 नंबर गेटजवळ अंपगाच्या रांगेत भक्त थल्लुरी भद्रया उभे होते. दरम्यान थल्लुरी रांगेत उभे असताना खाली कोसळले. थल्लुरी यांना साई संस्थानच्या मंदिरा जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ते मयत […]

शिडीतील साईंच्या दरबारात आलेल्या दोघा भाविकांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

सलग तीन दिवस सुट्या असल्यानं शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केलीय. साई दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झालाय.

साई मंदिरांच्या 3 नंबर गेटजवळ अंपगाच्या रांगेत भक्त थल्लुरी भद्रया उभे होते. दरम्यान थल्लुरी रांगेत उभे असताना खाली कोसळले. थल्लुरी यांना साई संस्थानच्या मंदिरा जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.

थल्लुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

थल्लुरी तेलंगणामधल्या खम्माम येथील रहिवाशी आहेत..तसंच रविवारी साई संमेलनसाठी आलेल्या भक्त के एम प्रकाश यांचाही भक्त निवासात मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number