भाजप इव्हीएम हॅक करुन निवडणूक जिंकणार; हार्दिक पटेलचा गंभीर आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपवर गंभीर आरोप केलेयत. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला आहे. काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच स्वतःचा पराभव झाकण्यासाठी हार्दिक […]
हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपवर गंभीर आरोप केलेयत. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला आहे.
काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
तसेच स्वतःचा पराभव झाकण्यासाठी हार्दिक आणि काँग्रेस असले आरोप करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.