जय महाराष्ट्र न्यूज, मालवण
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेसाठी सर्वच शहर प्राधिकरणांनी कंबर कसली आहे. यात सरशी मिळवण्यासाठी मालवण नगरपरिषदेने एक अनोखी शक्कल लढवली आहे.
या स्पर्धेचा महत्वाचा निकष स्वच्छता अॅप डाउनलोड करणे हा आहे. त्यामुळे अॅप डाउनलोड करून अधिकाधिक तक्रारी याव्यात यासाठी पालिकेने बक्षिसाची खैरात करण्याची योजना आखली आहे.
एवढचं नव्हे तर शहरात पाच ठिकाणी मोफत वायफाय सुविधाही देऊ केल्या आहेत. या योजनेनुसार भाग्यवान नागरिकांना सोन्याचं नाण आणि इतर बक्षिसांचं जणू गाजरचं मालवण नगरपरिषदेन दाखवलंय.
त्यामुळे स्पर्धेची जय्यत तयारी करणारी मालवण नगरपालिका प्रत्यक्षात किती स्वच्छतेची अंमलबजावणी करते हेच पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.