#कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही पण… धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई      कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपीना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला,तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेंव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेंव्हाच पुर्ण न्याय मिळेल. अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब […]

#कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही पण… धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपीना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला,तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेंव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेंव्हाच पुर्ण न्याय मिळेल. अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन या पुढे अशा घटनांना पायबंद बसेल.

 राज्यातील महिलांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे.

हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा आहे. कोपर्डी च्या निकालासाठी प्रयत्न करणा-या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत असेही धनंजय मुंडे म्हणाले. ट्वीटरवर त्यांनी आली प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number