जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत पुढील उपचार घेणार नाही, असा निर्णय अहमदनगर ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यानं घेतलाय. उद्धव मापारी असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
ऊसदरासाठी अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. त्यात 2 शेतकरी जखमी झालेत. त्यापैकी एक उद्धव मापारी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांवर कारवाई नाही, मात्र शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे गुन्हे मागे घेईपर्यंत पुढील उपचार घेणार नसल्याचं मापारी यांनी म्हटलंय.