जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
राज्यात तूर खरेदी सुरु झाली. यामुळे शेतकऱ्यांवरचं मोठं एक संकट थोडं हलकं झाले.
मात्र शासकीय GR मुळे बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्या बाहेर शेतकऱ्यांची तूर अजुनही खरेदी केली जात नाही.
तर, हिंगोली बाजार समिती यार्डात असलेला तूर उत्पादक शेतकरी 15 दिवसांपासून मार्केट यार्डात आहे.
त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांचे जेवणा-खाणाचे मोठे हाल होत आहे.
त्यातंच त्यांच्या तुरीची खरेदी नंतर करण्यात येणार असं सांगण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.