काँग्रेसमधील अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश

मुंबई, प्रतिनिधी, दि. ०७ मे २०२४ : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. दरम्यान, मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसमधील अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शांताराम पार्सेकर यांच्या नेत्तृत्वाखाली असणाऱ्या वॉर्ड क्रमांक १२ मधील वॉर्ड उपाध्यक्ष हरीश धोडिया, […]

काँग्रेसमधील अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश

मुंबई, प्रतिनिधी, दि. ०७ मे २०२४ : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. दरम्यान, मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसमधील अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शांताराम पार्सेकर यांच्या नेत्तृत्वाखाली असणाऱ्या वॉर्ड क्रमांक १२ मधील वॉर्ड उपाध्यक्ष हरीश धोडिया, माजी ब्लॉक अध्यक्ष सिद्धेश दिलीप पार्सेकर, वॉर्ड सचिव यश साळवी, वॉर्ड उपाध्यक्ष गणेश गामाटे, अशोक नवले, तालुका उपाध्यक्ष तृप्तेश दिलीप पार्सेकर, वैभव आचरेकर, रघु सोलंकी, किरण पटेल, रवी चरण, किरण मोरबीया, गोपाल जाधव, मुकेश रजपूत, धवल थापा यांनी मंगळवारी (दि. ७ मे २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number