जायकवाडी धरणातील पाणीसाठा जुनपर्यंत पुरणार

छत्रपती संभाजीनगर, ७ मे २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा साठा केवळ ७.७६ टक्क्यांवर आला असून सध्या उजव्याकालव्यातून पश्चिम महाराष्ट्राला पिण्यासाठी ९०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सध्याचा पाणीसाठा जूनपर्यंत छत्रपतीसंभाजीनगर, जालना आणि पश्चिम महाराष्ट्राला पिण्यासाठी पुरेल अशी  माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. बाष्पीभवनामुळे धरणाचा पाणीसाठा  झपाट्याने खालावत […]

जायकवाडी धरणातील पाणीसाठा जुनपर्यंत पुरणार

छत्रपती संभाजीनगर, ७ मे २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा साठा केवळ ७.७६ टक्क्यांवर आला असून सध्या उजव्याकालव्यातून पश्चिम महाराष्ट्राला पिण्यासाठी ९०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सध्याचा पाणीसाठा जूनपर्यंत छत्रपतीसंभाजीनगर, जालना आणि पश्चिम महाराष्ट्राला पिण्यासाठी पुरेल अशी  माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. बाष्पीभवनामुळे धरणाचा पाणीसाठा  झपाट्याने खालावत आहे. सध्या शिल्लक ७ टक्के पाणीसाठ्यातून पश्चिम महाराष्ट्र, जालना व संभाजीनगरला सुरळीत पाणीपुरवठा होईल असे नियोजन करण्यात आले आहे. जूनपर्यंत धरण मृतसाठ्यात पोहोचणार आहे. धरणाचा मृतसाठा २६ टीएमसी असून त्यात ८ टीएमसी गाळ आहे. जिवंत साठ्यात ५ टीएमसी गाळाचे प्रमाण असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई टाळण्यासाठी उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर होणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number