नागपूर, १ मे २०२४, प्रतिनिधी : विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या ४९ नेत्यांना पक्ष नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला नाही आणि पक्षाचे काम केले नाही म्हणून काँग्रेसने ४९ नेत्यांना जाब विचारला आहे. ज्यांना नोटीस बजावली आहे ते सर्व जण विदर्भातले नेते आहेत.
निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी काम न केल्याने नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना पक्षाने पक्षातून हाकलून दिले आहे. कान्हेरे रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्याम बर्वे यांचा साठी काम न केल्याने आणि प्रचारात सहभागी नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांनाही पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.