कोकणात किरण सामंतांचे नाराजीनाट्य

रत्नागिरी, १ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेत आले आहे. किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांकरवी त्यांच्या कार्यालयातील उदय सामंत यांचे फोटो काढून टाकले आहेत. यामुळे किरण सामंतांचे नाराजीनाट्य चर्चेत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास किरण सामंत उत्सुक होते. […]

कोकणात किरण सामंतांचे नाराजीनाट्य

रत्नागिरी, १ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेत आले आहे. किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांकरवी त्यांच्या कार्यालयातील उदय सामंत यांचे फोटो काढून टाकले आहेत. यामुळे किरण सामंतांचे नाराजीनाट्य चर्चेत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास किरण सामंत उत्सुक होते. पण ही जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपाला मिळाली. भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच किरण सामंत नाराज होते. पण नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी किरण सामंत त्यांच्यासोबत होते. यामुळे किरण सामंतांची नाराजी दूर करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. पण ताज्या घटनेमुळे किरण सामंतांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number