राहुल अमेठीतून, प्रियांका वायनाडमधून लढणार ?

नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस राहुल गांधी यांना वायनाड पाठोपाठ अमेठी लोकसभा मतदारसंघातून तसेच प्रियांका गांधी वाड्रा यांना रायबरेलीतून उमेदवारी देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ […]

राहुल अमेठीतून, प्रियांका वायनाडमधून लढणार ?

नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस राहुल गांधी यांना वायनाड पाठोपाठ अमेठी लोकसभा मतदारसंघातून तसेच प्रियांका गांधी वाड्रा यांना रायबरेलीतून उमेदवारी देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.

अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ मे रोजी संपणार आहे. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे उमेदवारी बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number