Homeक्राईम मुंबईला दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईला दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईत रविवार आणि सोमवार उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात शनिवार, रविवार […]
मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईत रविवार आणि सोमवार उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.