उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला उमेदवार सापडला

मुंबई, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवार सापडला आहे. काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून त्या नाराज होत्या. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा आणि या जागेवरून उमेदवारी […]

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला उमेदवार सापडला

मुंबई, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवार सापडला आहे. काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून त्या नाराज होत्या. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवावा आणि या जागेवरून उमेदवारी मिळावी, अशी वर्षा गायकवाड यांची आग्रही मागणी होती. पण हा मतदारसंघ मविआच्या जागावाटपात शिउबाठाकडे गेला. शिउबाठाने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून वर्षा गायकवाड नाराज होत्या. त्यांची नाराजी काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देत दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number