पुणे, प्रतिनिधी, दि. २५ एप्रिल २०२४ : सध्या सर्वत्रच लोकसभा निवडणूकांची चर्चा सुरू आहे. आणि लोकसभेचं बिगुल वाजत असताना आता राजकीय वर्तुळातून एकमेकांवर वार-पलटवार सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.
काय म्हणाले रविंद्र धंगेकर ?
देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून ‘मंगळसूत्रा’वर खरा डोळा भाजपचाच आहे, हे सिद्ध होते, अशा शब्दांत पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर तोफ डागली.