आढळराव पाटील डमी उमेदवार – डॉ. अमोल कोल्हे

पुणे, प्रतिनिधी, (दि. २५ एप्रिल २०२४) : शिरुरमधून गुरूवारी (दि. २५ एप्रिल २०२४) विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ […]

आढळराव पाटील डमी उमेदवार – डॉ. अमोल कोल्हे

पुणे, प्रतिनिधी, (दि. २५ एप्रिल २०२४) : शिरुरमधून गुरूवारी (दि. २५ एप्रिल २०२४) विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.


भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी केला. त्यानंतर गुरूवारी आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number