मुंबई, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना दिलेल्या निवडणूक चिन्हाचे मराठी नाव तुतारी असे आहे तर राशपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. यामुळे मतविभाजन होण्याचा धोका सुप्रिया सुळे यांना सतावत आहे. पण निवडणूक चिन्हाच्या नावाचे मराठी भाषांतर करून अनेक वर्ष झाली आहेत आणि याच नावाने हे चिन्ह यापूर्वीही वापरले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. अपक्ष उमेदवाराला चिन्ह देण्याची प्रक्रिया पण नियमानुसार झाली आहे. यामुळे तुतारी चिन्हावरून वाद करण्याला अर्थ नाही, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत
सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन विरुद्ध सोहेल शेख, अपक्ष