अमरावती, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मातोश्रीतून बाहेर न पडणारे अमरावतीत आले, असे भाजपाच्या तिकिटावर महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणांनी त्यांच्या भाषणातून उद्धव यांना लक्ष्य केले. अमरावती हा आधी उद्धव यांच्या पक्षाचा एक हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पण यावेळी अमरावतीमधून उमेदवार देण्याची हिंमत उद्धव यांनी केली नाही. मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला तर उद्धव यांनी विरोध केला नाही; असे नवनीत राणा म्हणाल्या. उद्धव सरकारच्या काळात समाजात दुही पसरवण्याचे काम झाले, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
राज्यातल्या ३३ महिन्यांच्या सरकारने समाजात दुही पसरवली
मातोश्रीच्या बाहेर न पडणाऱ्यांना अमरावतीत यावं लागलं
अमरावतीमध्ये कमळ फुलणार
अमरावतीत कापड उद्योगाच्या माध्यमातून २ ते ३ लाख रोजगार आणणार
अमरावतीच्या कापड उद्योगासाठी ११ लाख कोटींची गुंतवणूक आणणार