पुणे, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज (२४ एप्रिल २०२४) दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली..
या दौऱ्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे.