भाजपाने प्रचाराचा गिअर बदलला

अकोला, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपताच भाजपाने प्रचाराचा गिअर बदलला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आणि काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये यांचे संदर्भ देत भाजपाने आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. कलम ३७०, राम मंदिर, दहशतवाद आणि नक्षलवादाविरुद्धची कारवाई या मुद्यावर भाजपाने जाहीरपणे सविस्तर बोलण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने उदाहरणे सांगत काँग्रेसच्या भूमिका, […]

भाजपाने प्रचाराचा गिअर बदलला

अकोला, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपताच भाजपाने प्रचाराचा गिअर बदलला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आणि काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये यांचे संदर्भ देत भाजपाने आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. कलम ३७०, राम मंदिर, दहशतवाद आणि नक्षलवादाविरुद्धची कारवाई या मुद्यावर भाजपाने जाहीरपणे सविस्तर बोलण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने उदाहरणे सांगत काँग्रेसच्या भूमिका, त्यांचे निर्णय हे देशविरोधी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रचाराचा गिअर बदलला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अनुप धोत्रेंचा प्रचार करण्यासाठी अमित शाह आले होते. सभेत बोलताना अमित शाह यांनी अकोल्यातील विकास कामं तसेच कलम ३७०, राम मंदिर या विषयांवर भाष्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number