केजरीवालांचा तिहारमधील मुक्काम वाढला

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणमधील माजी मंत्री के. कविता या दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. दोघांनाही ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामुळे दोघांच्या तिहार तुरुगांतील मुक्कामात वाढ झाली आहे. केजरीवाल आणि के. कविता या दोघांना वेगवेगळ्या दिवशी ईडीने दिल्ली दारू घोटाळा […]

केजरीवालांचा तिहारमधील मुक्काम वाढला

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणमधील माजी मंत्री के. कविता या दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. दोघांनाही ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामुळे दोघांच्या तिहार तुरुगांतील मुक्कामात वाढ झाली आहे. केजरीवाल आणि के. कविता या दोघांना वेगवेगळ्या दिवशी ईडीने दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी अटक केले. काही दिवस ईडी कोठडीत राहिलेल्या केजरीवाल आणि के. कविता यांची नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. केजरीवाल यांनी मंगळवारी २३ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीतही जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीची दखल घेत न्यायालयाने जामीन देण्याची विनंती फेटाळली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number