‘उद्धव यांचा भाबडा बचाव’

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी भ्रमिष्ट आहे की नाही ते लोकं ठरवतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले मविआचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. एका मुलाखतीच्या निमित्ताने आदित्यला मुख्यमंत्री करून फडणवीस दिल्लीत जाण्याचा विचार करत होते, असा दावा केला. या दाव्याला फडणवीस […]

‘उद्धव यांचा भाबडा बचाव’

मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी भ्रमिष्ट आहे की नाही ते लोकं ठरवतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले मविआचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. एका मुलाखतीच्या निमित्ताने आदित्यला मुख्यमंत्री करून फडणवीस दिल्लीत जाण्याचा विचार करत होते, असा दावा केला. या दाव्याला फडणवीस यांनी अमरावती येथील सभेत बोलताना उत्तर दिले. आदित्यला मंत्री करण्याचा प्रस्तावच नव्हता, असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उद्धव यांनी स्वतःच्या दाव्याचा भाबडा बचाव सुरू केला आहे. आदित्यला मुख्यमंत्री म्हणून तयार करू, असे फडणवीस म्हणाले होते; असा नवा दावा उद्धव यांनी केला आहे.

उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

उद्धवकडून आदित्यच्या मुख्यमंत्रीपदाचा पुनरुच्चार
फडणवीसांना केंद्रात अर्थमंत्री व्हायचं होतं
मी भ्रमिष्ट आहे की नाही ते लोकं ठरवतील
सत्तेत येताच एमएमआरडीए रद्द करू
मुंबई पालिकेची लूट होऊ देणार नाही
निष्ठावान खासदार हवा की, गद्दार खासदार ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number