अमरावती, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राशपच्या शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पवार म्हणाले होते की, ‘अयोध्येच्या राम मंदिरात रामाशेजारी सीता नाही’. पवारांच्या या वक्तव्याचा फडणवीसांनी खरपूस समाचार घेतला. अयोध्येत बालक रामाचे मंदिर आहे. बालक रामाच्या मूर्तीशेजारी सीतेची मूर्ती कशी असेल ? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.