पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. दिवसभर कडक उन होते. पण या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी हक्क बजावला. […]

पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. दिवसभर कडक उन होते. पण या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशात ६२.३७ टक्के मतदान झाले. त्रिपुरात सर्वात जास्त आणि बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.

लोकसभा निवडणूक, मतदानाची अंतिम टक्केवारी

रामटेक – ५४.७१ टक्के
नागपूर – ५१.२० टक्के
भंडारा – गोंदिया – ५८.४४ टक्के
गडचिरोली – चिमूर – ६६.३० टक्के
चंद्रपूर – ५६.१४ टक्के
राज्यात ५६.८४ टक्के मतदान

अशी आहे लढत

रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

देशभरातील मतदानाची अंतिम टक्केवारी

अंदमान निकोबार – ६३.९९ टक्के
अरुणाचल प्रदेश – ६७.४९ टक्के
आसाम – ७२.२७ टक्के
बिहार – ४८.५० टक्के
छत्तीसगड – ६३.७८ टक्के
जम्मू काश्मीर – ६५.०८ टक्के
लक्षद्वीप – ५९.०२ टक्के
मध्य प्रदेश – ६६.४२ टक्के
महाराष्ट्र – ५६.८४ टक्के
मणिपूर – ६९.१८ टक्के
मेघालय – ७४.३८ टक्के
मिझोरम – ५४.३५ टक्के
नागालँड – ५६.९१ टक्के
पुदुच्चेरी – ७३.७६ टक्के
राजस्थान – ५७.२६ टक्के
सिक्कीम – ७३.८२ टक्के
तामिळनाडू – ६७ टक्के
त्रिपुरा – ८०.४६ टक्के
उत्तर प्रदेश – ५८.८४ टक्के
उत्तराखंड – ५४.५० टक्के
पश्चिम बंगाल – ७७.५७ टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number