कडक उन्हात कडक मतदान

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. दिवसभर कडक उन होते. पण या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी हक्क बजावला. […]

कडक उन्हात कडक मतदान

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. दिवसभर कडक उन होते. पण या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी हक्क बजावला.

लोकसभा निवडणूक, मतदानाची अंतिम टक्केवारी

रामटेक – ५२.३८ टक्के
नागपूर – ४९.०७ टक्के
भंडारा – गोंदिया – ५६.८७ टक्के
गडचिरोली – चिमूर – ६६.२७ टक्के
चंद्रपूर – ५५.११ टक्के
राज्यात ५५.३५ टक्के मतदान

अशी आहे लढत

रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

देशभरातील मतदानाची अंतिम टक्केवारी

अंदमान निकोबार – ५६.८७ टक्के
अरुणाचल प्रदेश – ६६.३६ टक्के
आसाम – ७१. ४३ टक्के
बिहार – ४७. ७४ टक्के
छत्तीसगड – ६३.४१ टक्के
जम्मू काश्मीर – ६५.०८ टक्के
लक्षद्वीप – ५९.०२ टक्के
मध्य प्रदेश – ६४ टक्के
महाराष्ट्र – ५५.३५ टक्के
मणिपूर – ६८.८१ टक्के
मेघालय – ७४.१९ टक्के
मिझोरम – ५४.२३ टक्के
नागालँड – ५६.९१ टक्के
पुदुच्चेरी – ७३.५० टक्के
राजस्थान – ५५.१९ टक्के
सिक्कीम – ६८.७१ टक्के
तामिळनाडू – ६२.६४ टक्के
त्रिपुरा – ८०. १७ टक्के
उत्तर प्रदेश – ५८.१४ टक्के
उत्तराखंड – ५३.८१ टक्के
पश्चिम बंगाल – ७७.५७ टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number