‘तडस आणि राणांना विजयी करा’

वर्धा, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताला आत्मनिर्भर करणे आणि अधिकाधिक विकसित करणे हेच स्वप्न उराशी बाळगत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी विकसित भारतासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगितले. विकासाकरिता मतदान करण्याचे आवाहन मोदींनी मतदारांना केले. केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार कार्यरत आहे. विदर्भात वेगाने पायाभूत विकास होत आहे. हा […]

‘तडस आणि राणांना विजयी करा’

वर्धा, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताला आत्मनिर्भर करणे आणि अधिकाधिक विकसित करणे हेच स्वप्न उराशी बाळगत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी विकसित भारतासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगितले. विकासाकरिता मतदान करण्याचे आवाहन मोदींनी मतदारांना केले.

केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार कार्यरत आहे. विदर्भात वेगाने पायाभूत विकास होत आहे. हा विकास असाच सुरू राहण्यासाठी भक्कम पाठिंबा आवश्यक असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भर उन्हातही मतदारांनी मतदान केले. जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
‘ज्याचा कुणी नाही त्याचा मोदी आहे’
‘गॅरेंटी द्यायला हिंमत लागते’
‘प्रभुरामाच्या सूर्यतिलकाची काँग्रेसने खिल्ली उडवली’
‘काँग्रेसचे काम म्हणजे बारशाला गेला आणि बाराव्याला आला’
कितीही अडचणी आल्या तरी गॅरेंटी पूर्ण करणार – मोदी
ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंत आरोग्यविमा देणार – मोदी
काँग्रेसचे विचार कायम शेतकरीविरोधी – मोदी
काँग्रेस काळात शेतकऱ्यांची स्थिती बिकट होती – मोदी
काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे विदर्भाला फटका – मोदी
केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर विदर्भात वेगाने पायाभूत विकास – मोदी
वर्ध्यात रामदास तडस आणि अमरावतीत नवनीत राणांना विजयी करा – मोदी

अशी आहे लढत

अमरावती – नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित
वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number