कडक उन्हातही भरघोस मतदान

नागपूर, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. कडक उन्हातही मतदारांनी भरघोस मतदान केले आहे. यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५४.८५ […]

कडक उन्हातही भरघोस मतदान

नागपूर, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. कडक उन्हातही मतदारांनी भरघोस मतदान केले आहे. यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले.

लोकसभा निवडणूक, संध्याकाळी ५ पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

रामटेक – ५२.३८ टक्के
नागपूर – ४७.९१ टक्के
भंडारा – गोंदिया – ५६.८७ टक्के
गडचिरोली – चिमूर – ६४.९५ टक्के
चंद्रपूर – ५५.११ टक्के
राज्यात ५४.८५ टक्के मतदान

अशी आहे लढत

रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number