पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार तर मविआच्या उमेदवार म्हणून राशपकडून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. नियमानुसार दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या संपत्तीची माहिती अर्जासोबत दिली आहे. ही माहिती आता सार्वजनिक झाली आहे.
सुप्रिया सुळे देशातील श्रीमंत खासदारांपैकी एक
सुप्रिया सुळे यांची स्थावर आणि जंगम एकूण संपत्ती सुमारे १४१ कोटी रुपये
शरद पवारांपेक्षा सुप्रिया चौपट श्रीमंत आहेत
शरद पवारांची घोषित संपत्ती सुमारे केवळ ३५ कोटी रुपये
सुप्रिया यांच्याकडे स्थावर मालमत्ता सुमारे ११९ कोटी रुपये तर जंगम मालमत्ता सुमारे १७ कोटी रुपये
सुमारे दोन कोटी रुपयांच्या शेतजमिनीच्या सुप्रिया मालक
सुप्रिया सुळे यांच्या खिशात १ लाख रोख
सुप्रिया यांच्या डोक्यावर माहेरच्या कुटुंबीयांकडून घेतलेले ५५ लाखांचे कर्ज
सुप्रियाकडून भावजय सुनेत्रा यांना ३५ तर, पुतण्या पार्थला २० लाखाचे देणे
पाच वर्षात सुप्रिया सुळे यांची संपत्ती दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांनी वाढली
वर्ष २०१९ मध्ये सुप्रिया यांच्याकडे सुमारे ११७ कोटी तर २०२४ मध्ये सुमारे १४० कोटी रुपये