नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याच्या निमित्ताने पायाला चाकं लावून संपूर्ण देशात फिरत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज रात्री प्रचार संपवून दिल्लीला परत जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रचार सुरू करतात. पण शुक्रवारी प्रचार संपवल्यानंतर पंतप्रधान मोदी नागपूर येथे मुक्कामासाठी थांबणार आहेत. वर्धा येथील सभा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री नागपूर येथे मुक्कामाला थांबणार आहेत. पंतप्रधानांचा नागपूरच्या राजभवनात मुक्काम असेल. शनिवारी सकाळी पंतप्रधान प्रचारासाठी नव्या ठिकाणी रवाना होतील.