केजरीवालांना तुरुंगात मिळतेय मिठाई

नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दारू घोटाळ्यातील संशयित अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मिठाई मिळत असल्याचा आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रक्तदाब आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढावे आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होता यावे यासाठी केजरीवालांनी गोडाधोडाचे खाणे वाढवल्याचा आरोप पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. केजरीवाल दररोज तुरुंगात जास्त साखरेचा चहा […]

केजरीवालांना तुरुंगात मिळतेय मिठाई

नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दारू घोटाळ्यातील संशयित अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मिठाई मिळत असल्याचा आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रक्तदाब आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढावे आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होता यावे यासाठी केजरीवालांनी गोडाधोडाचे खाणे वाढवल्याचा आरोप पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. केजरीवाल दररोज तुरुंगात जास्त साखरेचा चहा पीत आहेत तसेच आंबे, केळी, मिठाई अशा गोड पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. नियमितपणे केजरीवाल बटाट्याची भाजी आणि पुरी असा आहार घेत आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्यांचे आरोप केजरीवाल समर्थक असलेल्या आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांनी फेटाळले आहेत. ईडी केजरीवालांना घरुन मिळणारे जेवण बंद व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number