कोकणात राणे VS राऊत

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रतिक्षेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, हा तिढा अखेर सुटला आहे. गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता कोकणात राणे विरुद्ध राऊत अशी लढत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग […]

कोकणात राणे VS राऊत

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रतिक्षेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, हा तिढा अखेर सुटला आहे. गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता कोकणात राणे विरुद्ध राऊत अशी लढत होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे विरुद्ध शिउबाठाचे विनायक राऊत विरुद्ध वंचितचे काका जोशी अशी लढत होणार आहे. मुख्य लढत ही भाजपाचे नारायण राणे विरुद्ध शिउबाठाचे विनायक राऊत अशी होणार आहे.

सुरुवातीपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे लढतील अशा चर्चा होत्या. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या दोन-तीन उमेदवारी याद्या जाहीर झाल्या. मात्र त्यात नारायण राणे यांचे नाव नव्हते. अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणीही करण्यात येत होती. दुसरीकडे नारायण राणेंनीही सभांचा धडाका लावला होता. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तेरावी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर करण्यात आली. नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिउबाठा गटाचे विनायक राऊत अशी लढत होणार आहे. विनायक राऊत या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकसभा लढणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही उमेदवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. नारायण राणेंची राजकीय सुरुवात शिवसेनेपासूनच झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास केला तर विनायक राऊत मात्र सुरुवातीपासून शिवसेनेत राहिले. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले आणि केंद्रीय मंत्रीही बनवले तर विनायक राऊत २०१४ पासून दोनदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार म्हणूनही काम केले आहे.

नारायण राणे यांची राजकीय कारकिर्द

महाराष्ट्राचे महसूलमंत्री – १९९६
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
जुलै २००५ पर्यंत शिवसेना सदस्य नंतर काँग्रेस सदस्य
महाराष्ट्र शासनाचे मंत्री – फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २०१४
विधानसभा निवडणुकीत पराभव – २०१४
विधान परिषद सदस्य – जुलै २०१६ ते सप्टेंबर २०१७
‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना – २०१७
भाजपाकडून राज्यसभा सदस्य – एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२४
‘महाराष्ट्र स्वाभिमान’ भाजपात विलीन – ऑक्टोबर २०१९
केंद्रात मंत्री – जुलै २०२१ पासून

विनायक राऊत यांची कारकिर्द

१९८५ ते १९९२ – कौन्सिलर, बीएमसी, मुंबई
१९९९ ते २००४ – सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
२००५ – अखिल भारतीय पक्ष सचिव, शिवसेना
२०१२ ते २०१४ – सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
२०१४ – १६ व्या लोकसभेसाठी निवडून आले
२०१९ – १७ व्या लोकसभेसाठी निवडून आले
२०१९ – लोकसभा शिवसेना नेते

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number